shardulc

photo by Steph Stevens

शार्दुल चिपळूणकर

नमस्कार!

मी स्वित्झर्लंडमधील EPFL या विद्यापीठात संगणकशास्त्रात PhD करत आहे. संगणकीय भाषा आणि अभियांत्रिकी (programming languages and software engineering) हे माझे अभ्यासाचे विषय आहेत. विशेषतः सर्व प्रकारच्या तांत्रिक (उ. एखाद्या अल्गोरिदम्स्‌च्या पाठ्यपुस्तकातील) आकृत्या सुटसुटीत आणि संगणकाला समजतील अशा प्रकारे व्यक्त करण्यासाठी भाषा/व्याकरणं आणि त्यांचं चित्ररूपांतर, यांवर मी संशोधन करतो. माझ्या कामाविषयीची अधिक तपशीलवार माहिती इंग्रजी पृष्ठांवर उपलब्ध आहे.

EPFL ला प्रवेश घेण्याआधी मी MIT मधून २०२२ साली गणित आणि संगणकशास्त्र ह्या विषयांत BS पदवी मिळवली. माझं शालेय शिक्षण थोडं कॅलिफोर्नियात आणि थोडं पुण्यात झालेलं आहे. सविस्तर माहितीसाठी माझा CV पहा.

संगणकांव्यतिरिक्त मला भाषा (शब्दांचा इतिहास, शब्दकोडी, अनुवादन, टंककारी, भाषेचं बोधशास्त्र, इ.) आणि संगीत (हिंदुस्तानी शास्त्रीय, आणि ध्वनिमुद्रण/अभियांत्रिकी) ह्या विषयांचीही आवड आहे.

संपर्क — shardulc@proton.me (PGP), Mastodon